मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल दादर येथील शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी मशिद, भोंगा आणि माहिम येथील अनधिकृत केलेल्या बांधकामावरून सरकारला कडक शब्दात इशारा दिला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. तर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचं आपल्या जाहीर सभेतून कौतुक केलं आहे.
हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
राज ठाकरे सभेत म्हणाले की, मला धर्मांध हिंदू नको, धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमानही माझ्यासोबत हवा आहे पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा हवा. जो पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/11च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावण्याची हिंमत ठेवतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी सत्तेत आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अनधिकृतपणे पसरलेल्या अफजल खानाच्या कबरीचं बांधकाम तोडून ती कबर पुन्हा पुर्वस्थितीत आणली ह्याबद्दल राज ठाकरे यांनी सरकारचे आभार मानले.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
त्याचबरोबर मशिदीवर काही भोंगे उतरले आहेत. बाकीचे भोंगे उतरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही बाजूला व्हा. मग आमचं आम्ही बघू. असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला. यावेळी ते म्हणाले की, सरकार जर म्हणत असेल की आमच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आहे. तर मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनावेळी मागच्या सरकारने माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर जे गुन्हे दाखल केलेत. ते गुन्हे मागे घ्या. कारण मशिदींवरचे भोंगे उतरावेत. ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“दरारा…! राज ठाकरेंनी फक्त मुद्दा उपस्थित केला, तिकडे प्रशासनाची धडक कारवाई
- हेही वाचा…“..तर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही”, राज ठाकरेंचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..