बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी केला. मात्र, मी भाजपची पैसे न घेता पक्षात आलो. मला पैसे नको, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होते. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आले नाही, असे पाटील यांनी सांगितले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते नेते कोण? सोमवारी फुटणार राजकीय बॉम्ब
मला दिलेली पैशांची ऑफर न घेता मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे पाटील म्हणाले. मला प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते. त्यावेळी मला कितीही पैसे मागता आले असते. पण, मी पैशांची मागणी केली नाही. लोकांची सेवा करण्यासाठी मी मंत्रीपदाची मागणी केली होती, असेही पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, मला माहित नाही मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. मात्र, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलणे झाले आहे.
चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय, हवेत गोळीबार करू नका – संजय राऊत
पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या १६ आमदारांपैकी एक आहेत. या आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते.
दरम्यान, राज्यात येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र, येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. उद्या (ता. १४ सप्टेंबर) कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पक्षांतर केलेले आमदार अधिवेशनात नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे.
Read Also :
- मोठी बातमी : OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ
- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेसच्या आमदाराकडून छळ; पी. एन. पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल
- राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार – प्रविण दरेकर
- शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचे खुले आवाहन