राजस्थानातील राजकीय घडामोडींची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली. तसेच तात्यांचे प्रदेशाध्यक्ष पद देखील काढून घेण्यात आले या सर्व घटनेनंतर सचिन पायलट आता भाजप मध्ये प्रवेश करणार अशी शक्यता निर्माण झाली असतानाच आता मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी केली आहे.
सचिन पायलट यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने ते तिसरी आघाडी अर्थात नवीन पक्ष स्थापन करण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.
काँग्रेसने उगारलेल्या कारवाईच्या बडग्यानंतर माजी मंत्री आणि पायलट गटाचे आमदार विश्वेंद्र यांनी हा तर 20-20 सामना असून कसोटी सामना बाकी असल्याचे म्हणत स्वपक्षाला आव्हान दिले होते. त्यामुळे पायलट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.