मुंबई : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 40 उमेदवारांनी केलेल्या अर्जपैकी 33 उमेदवारांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. तर सात उमेदवारांचे एबी अर्ज अपुर्ण भरल्याने बाद ठरवण्यात आले आहे. यामध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार मनोहर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अपुर्ण भरल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. तर अपक्ष उमेदवार चेतन ढोरे यांनी देखील आपल्या उमेदवारी अर्जात प्रतिज्ञापत्र अपुर्ण भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
हेही वाचा..“आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं”
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येत्या 26 फेब्रुवारी रोजी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला असून ही निवडणुक तिरंगी होणार आहे. त्यासाठी सध्या राजकीय प्रचार सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा..राहुल कलाटे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार, जाणून घ्या, किती संपत्ती ?
त्याचबरोबर भाजपकडून शंकर जगताप यांनीही देखील डमी अर्ज सादर केला होता. अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध झाल्याने जगताप यांचा अर्ज आपोआप बाद झाला आहे. तर इतर राजकीय पक्षांसह बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम यांच्यासह इतर 26 अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. यातच 10 फेब्रुवारी पर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून यामध्ये ही पोटनिवडणुक कोण लढवणार ते ठरणार आहे.
हेही वाचा..‘“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता, त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका,” उद्धव ठाकरेंची आयोगाला मागणी
दरम्यान, यातच निवडणुक आयोगाकडून निवडणुकांसाठी प्रचार करण्यासाठी लागलेल्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. सुरूवातीला विधानसभा निवडणुकीसाठी ही मर्यादा 28 लाख होती. ती आता 40 लाखांवर गेली आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडणुकीसाठी होऊ दे खर्च करावा केला तरी काही हरकत नसणार. यातच आज चिंचवडच्या उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरूवात केली आहे.
Read also
- हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
- हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”
- हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल
- हेही वाचा..आमदाराकीची शपथ घेतल्यानंतर तांबे लागले कामाला, केसरकरांची भेट, त्यानंतर थेट आझाद मैदानावर
- हेही वाचा..“एका बाजूला मोदींच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला अडाणींच्या घोषणा,” सभागृहात मोठा गदारोळ”