मुंबई : नारायण राणे आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी नारायण राणे यांना खडे बोल सुनावले. राणेंनी मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचा अपमान करणं थांबवावं आणि मर्यादेत रहावं असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी, “राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना असंसदीय भाषेचा वापर करु नये. उद्या उठून कोणी चुकीच्या भाषेचा वापर करत ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानशीलात वाजवेल’ असं म्हटलं तर ते (केंद्र सरकार) त्या व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील,” असं मत व्यक्त केलं.
शिवसेना अडचणीत येणार? रश्मी – उद्धव ठाकरेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार दाखल; कारवाई होणार?
सध्या बंगळुरुच्या शासकीय दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी “पंतप्रधानांविरोधात बोलणाऱ्यासाठी जो नियम लावला जातो तोच राणेंना लागू होतो ज्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा वापरली,” असंही म्हटलं आहे. “नियम आणि सन्मानाच्या दृष्टीने विचार केल्यास मुख्यमंत्री पदही पंतप्रधान पदाच्या तुलनेचेच आहे,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणामुळे मंगळवारी दिवसभर शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आला.
अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल
संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या नेत्यासंदर्भातील अशी वक्तव्य सहन करणार नसल्याचं सांगितलं. “राणेंनी त्यांच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. एक खासदार आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना काय आणि कसं बोललं पाहिजे हे समजायला हवं. शिवसेनेविरोधात लढण्याची हिंमत कोणातही नाही. त्यामुळे ते अशी वादग्रस्त विधाने करतात,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. राऊत सध्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील लीला पॅलेस हॉटेलमध्ये राहत आहे. कालच त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Read Also :
- आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- “भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर
- भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
- एक सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश जारी, महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले
- शिवसेना खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा; ‘ती’ याचिका मुंबई हायकोर्टाचा फेटाळली