मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचारी विलगीकरण्याच्या पगारवाढीच्या मागणीवरून संपावर गेले होते. अशातच आता एसटीच्या संपातील पाठींबा दिलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे तडफदार आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे आमदार महेश किसन लांडगे
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे मात्र अद्यापही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलगीकरणाचा निर्णय हा कोर्ट देणार आहे आणि त्याला थोडा वेळही लागेल. संप हे पगारवाढीसाठीच होत असतात. सरकारने एस.टी.कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर कामगारांचे पुढारीच कामगारांचे रक्षण करोत.”असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी एसटी संपावर पुन्हा निशाणा साधला आहे.
मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ
एसटी कर्मचाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीनंतरही आम्ही संपावर आहोत व संप मागे घेणार नाहीत अशी भूमिका घेणे अत्यंत चुकीचे आहे. एसटी कर्मचारी आता पगारवाढ झालेली असतानाही संपावर जाऊन आपल्या कुटुंबाला विनाशाकडे ढकलत आहेत अशी टीका देखील राऊतांनी केली आहे. तसेच,कोणत्याही संपाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असते आणि ते साहजिक आहे. एस.टी. संपातही राज्याचे, सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झालेच आहे. त्यामुळे संपकऱ्यांच्या नेत्यांकडून ही नुकसानभरपाई न्यायालयाने करून घेतली पाहिजे. ज्यांनी एसटीसाठी रक्त, घाम गाळला आहे अशांनीच तोट्यातली एस.टी. दरीत ढकलणे योग्य नाही,” असेही शिवसेनेने म्हटले आहे.
कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार
त्याचवेळी, शेतकरी नेते सदाभाऊ खोत व भाजप आमदार गोपीचंद पडळकर या पुढाऱ्यांचा तसा एस.टी. कामगारांशी संबंध नव्हता. तरीही ते संपात घुसले, पण संप हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात, असा टोलाही शिवसेनेने त्यांना लगावला आहे.
Read Also :
- एसटी संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी; जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट
- महेश लांडगे ‘ऑन प्रॅक्टिकल मोड’ : अधिकारी पिंपरी- चिंचवडकर आहेत; आयुक्तांचे ऐका अन् माझे फ्लेक्स काढून टाका!
- महापालिका आयुक्तांचे आदेश : आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाका!
- शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर छापा; किरीट सोमय्यांच्या आरोपावर ED ‘अॅक्शन मोड’मध्ये
- पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार- नाना पटोले