औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना भाजप, काँग्रेसचेही अनेक नेते उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्री मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी, भाजपच्या नेत्यांकडे पाहून, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहेत.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
दरम्यान, यांनतर दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना मोठं विधान करत, ‘काँग्रेसवाले खूप त्रास देतात, एकदा या, आपण बसून बोलू, असं मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितलं आहे, ‘असा गौप्यस्फोट केला. तसेच, यावेळी बाळासाहेब थोरातही तिथे होते. त्यांनी हे ऐकलं आणि तेही हसले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी माध्यमांनी युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का? असा सवाल त्यांना केला. त्यावर, ‘मुंबईत या. आपण दोघे मिळून चर्चा करू,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं.
‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी, मुख्यमंत्री मला कानात म्हणाले, ‘काँग्रेसवाले मला ताप द्यायला लागल,. तर मी भाजपवाल्यांना बोलावून घेत असतो. मग ते मला ताप कमी देतात. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, सध्या ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी कुणीही तुम्हाला कोणताही ताप देणार नाही. पण तुम्हाला जर तसा काही अनुभव आला असेल तर आपण बसू,’ असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया
तसेच, ‘भाजप-शिवसेना पूर्वीचे मित्र होते. पण शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत घरोबा केला. असं असलं तरी त्यांनी तयारी दाखवली तर भाजप समविचारी पक्षाचं स्वागतच करेल. आम्ही पुन्हा मित्र होऊ शकतो. संसारात काहीतरी घडल्याशिवाय माणूस बोलत नसतो. मुख्यमंत्र्यांना आमचाही आणि आता त्यांचाही अनुभव आहे. राज्यातल्या दोन्हीही मतदारांना त्यांचं तिकडे जाणं पसंत पडलेलं नाही, त्यांना अजूनही वाटतंय त्यांनी इकडे यावं,’ असं दानवे म्हणाले.
Read Also :
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
- ब्रेकिंग! वाझेचा खुलासा, पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले २ कोटी