नागपुर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली. तिला विरोध करण्यासाठी ही काँग्रेसची मंडळी नागपूर कोर्टात गेली आहेत. एकीकडे राज्याकडे पैसे नाही म्हणायचं आणि दुसरीकडे राहुल गांधी स्वतः काल महिलांना तीन हजार रुपये देऊ म्हणाले, मग जर पंधराशे द्यायला पैसे नाहीत. तर तीन हजार कुठून देणार ? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना केला. मुंबईत राहुल गांधी यांनी महिलांना ३००० रूपये देण्याचं अश्वासन दिले. त्यावर ते बोलत होते.
हेही वाचा…पतीसाठी पत्नी पुतण्याच्या विरोधात प्रचाराला मैदानात उतरली.. कोण मारणार बाजी?
कर्नाटक आणि छत्तीसगडप्रमाणे निवडणुकीत घोषणा करायच्या आणि नंतर शक्य नाही म्हणायचे. असे विरोधकांचे महाराष्ट्रात सुद्धा तेच चालू आहे. या भागात लाखो हेक्टरवर लिंबूचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे इथे लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी माझ्याकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचे सरकार पुन्हा आल्यावर इथे नक्की लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करू असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई
दरम्यान, गेल्या अडीच वर्षात समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे, जलयुक्त शिवार योजना अशा अनेक लोकोपयोगी योजना फक्त बंद करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. तर दोन वर्षात सर्व प्रकल्प पुन्हा सुरु करून राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आम्ही केले. दोन वर्षात तब्बल १२४ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. शेतकरी सन्मान योजनेतून १२ हजारांची मदत केली. १ रुपयात पीक विमा योजना दिली, सततच्या नुकसानीला देखील नुकसानभरपाई महायुती सरकारने दिली. शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे सरकार आहे असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“त्यामुळेच भाजपच्या हातातून सत्ता काढून घेणं महत्वाचं”, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा..“खंजीर शेजारी बसून खुपसलाय”, मनसेची मोठी फौज ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…वडगावशेरीत ‘सुनील टिंगरे’ रेडझोनमध्ये..? बापू पठारेंचं तगडं आव्हान
हेही वाचा…“फडणवीस चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात”, मतदारसंघात कॉंग्रेसचे दुखणे काय ?
हेही वाचा…माजी आमदाराला लोकं कंटाळलीत, पुरंदरमध्ये संभाजी झेंडे प्रचारात सक्रीय