नाशिक : शिवसेनेच्या पुढाकारातून महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. हे सरकार नसते तर भुजबळही मंत्री म्हणून दिसले नसते. नाशिकला तुमच्याकडे लाल दिवा आहे व तसा तो कधीतरी आमदार सुहास कांदे यांच्यानिमित्ताने नांदगावलाही येऊ द्यावा, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले.
तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील
पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा झाला. मात्र त्यात समन्वयाएैवजी भविष्यातही ही राजकीय धग सुरु राहील असा संदेश राऊत यांनी दिला. ते म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध सत्ता केंद्रांवरील शिवसेनेचा फडकणारा भगवा ध्वज खाली उतरवू देणार नाही. आता भुजबळांनी नांदगावचा नाद सोडून द्यावा.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला हारवणे शक्य नाही, म्हणून खुद्द शरद पवार रणांगणात – चंद्रकांत पाटील
खासदार राऊत म्हणाले, शिवसेना कार्यकर्त्यांनी यापुढे राज्यात शंभर आमदार निवडून आणण्याचा संकल्प करावा. छगन भुजबळ महाआघाडीचे नेते आहेत. त्यांनी आमदार कांदे यांना समजावून घ्यायला हवे. कांदे यांची नांदगाव मतदारसंघातील विकासामागची तळमळ समजवून घेणे गरजेचे आहे. आमदार कांदे चांगला पाहुणचार करतात. त्यांनी एकदा भुजबळांनाही बोलावून घ्यावे. त्यांचा छानसा पाहुणचार करावा. भेदाभेद करू नये. निधीचे सामान वाटप करावे, असा सल्लाही त्यांनी भुजबळांना दिला.
शाहरुख खाननं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील – छगन भुजबळ
ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ महाआघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही त्यांचा सन्मान राखतो, असे सुरवातीलाच स्पष्ट करीत खासदार संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांची नांदगाव मतदारसंघातील विकासासाठी प्रामाणिक तळमळ आहे, हे लक्षात घेऊन भुजबळांनी भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर विकासाची तळमळ राखणारा हा पहिला आमदार आमच्या शिवसेनेचा असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवसेनेच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात टिकून आहात. आज महाविकास आघाडीच्या सरकारात छगन भुजबळ नेते आहेत. त्यांचा सन्मानही आम्ही करू. मात्र, हा सन्मान टिकविण्याची जबाबदारीदेखील तुमची आहे.
Read Also :
- भाजप खासदाराला साधा निवडणुकीचा अर्ज भरता येत नाही, याला काय म्हणायचं – गुलाबराव पाटलांचा टोला
- पिंपरी चिंचवडनंतर आता शरद पवारांची पुणे महापालिकेकडे कूच; दिवाळीनंतर सत्तांतराची रणनिती आखणार!
- आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळा गोंधळ संपेना; एकाच वेळी चार परिक्षांचे वेगवेगळे केंद्र, विद्यार्थी संतापले
- औरंगाबादच नाव बदलण्याची आमच्यात हिंमत आहे, तुम्ही मैदानात या, दाखवतो – चंद्रकांत खैरे
- माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे – संजयकाका पाटील