बीड : ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं. त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. असा हल्लाबोल बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच तुम्ही म्हणता माझ्या बापाचं फोटो लावू नका, मी म्हणतो माझ्या शिवभक्ताचं नाव तुम्ही लावू नका, असा इशारा देखील तानाजी सावंत यांनी दिला आहे.
“आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचं घड्याळ बंद पडणारच”
आज खऱ्या अर्थाने सगळ्या शिवसैनिकांना कळलं की यांची बौद्धिक क्षमता काय आहे. गेले 20 तीस वर्ष आपला सर्व संसार मो़डून शिवसेनेसाठी झटलो. मी अशा माणसाच्या हाताखाली काम करीत होतो, त्याला फक्त शिवसैनिकांचे कष्टच सोसायचं माहित होतं. त्याला काही देण्याचं माहिती नव्हतं. फक्त येना बॅंक होती, त्याला काही देना बॅक माहितीच नव्हती. त्यांनी आमच्यावर 50 खोक्कांचा आरोप लावला. परंतु 50 खोक्यांचा काय अर्थ होतो आणि याची व्याख्या ही फक्त मुख्यमंत्री आणि तानाजी सावंतलाच माहिती आहे.
राष्ट्रवादी, अन् आता भाजपच्या नेत्याचीही ठाकरेंना साथ; भाजप नगरसेविकेचा सेनेत प्रवेश
तसेच जर तुम्ही माझ्या नेत्यावरही टीका करण्याची पंरपरा सोडली नाही तर या बीडमध्ये येऊन तुम्हाला नागडा करून मारल्याशिवाय राहणार नाही. ज्या बापाने तुम्हाल जन्माला घातलं. त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. असा घणाघात देखील तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला.
Read also
- “तर तुमचा धर्म घ्या अन् पाकिस्तानात चालते व्हा”; राज ठाकरेंचा इशारा
- सोसायट्यांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी ‘ नमो करंडक ‘ स्पर्धेचे आयोजन
- “सीतारमण यांची बारामतीत घराणेशाहीवर टिका, राष्ट्रवादीने भाजपची यादीच दिली”
- “शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत”; मुख्यमंत्रीही संतापले
- “तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही”?