उस्मानाबाद : उजनीच्या पाणी प्रश्नावरुन सोलापूरकरांची नाराजी ओढवून घेतलेले राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सोलापूरचे शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उपनेते तथा सोलापूर संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणे यांना शिवसेनेच्या भाषेत सज्जड दम दिला आहे.
‘पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द वापरा. आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आलात. तुम्हाला तर जनतेने फेकून दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादने तुम्ही सत्तेत आहात हे कधीच विसरू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी वक्तव्य करत आहात. तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द व भाषा वापरा. तुमच्यात हिम्मत असेल आणि तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा’, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला आहे.
नितीन राऊतांच्या मनात नाना पटोलेंबद्दल अढी? नागपूर काँग्रेसमध्ये मतभेदाच्या चर्चेला उधाण
गटनेत्यांनी, नगसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? असं बोलत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असता ते मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरु द्या, आपलं आपण करु. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करु. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण सुरुवात करुया, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.
Read Also :
- “मुख्यमंत्री मरू द्या”, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली
- बाबासाहेबांनाही कधी वाटलं नसेल, भविष्यात असे राज्यपाल येतील म्हणून; हसन मुश्रीफांचा कोश्यारींवर घणाघात
- १२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले
- औरंगाबादेत स्वातंत्र्यदिनी एमआयएम’ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे
- बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी मी आत्महत्या करेल; खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक