मुंबई : राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, अशी अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
उद्योगांना वीजदरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग आणि खनिकर्ममंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
वीज दर कमी करण्याचा संकल्प ऊर्जा विभागाने केला असून यासाठी चालू वर्षासाठी व पुढील चार वर्षासाठी रोड मॅप तयार करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले की, राज्यात रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी मोठे उद्योग येणे आवश्यक आहे. अधिकाधिक उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अन्य राज्यांच्या तुलनेत वीज दर स्वस्त असावेत यासाठी शासन गंभीर आहे. उद्योगावरील क्रॉस सबसिडीचा हा भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने हा भार स्वतः स्वीकारायला हवा आणि तशी अर्थसंकल्पात तरतूद करावी यासाठी पुढील पावले टाकली जातील
Read Also :
- कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचे काम जगात सर्वोत्तम – फडणवीस
- ‘त्या’ खुलाशानंतर धनंजय मुंडेंचे पहिले ट्विट…
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, नवाब मलिक म्हणाले…
- भंडारा प्रकरण : विदर्भातील मोठ्या नेत्याच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई नाही ? भातखळकरांचा सरकारवर निशाणा
- ‘गांधीजींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य