राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सध्या दौऱ्यांचा धडाका सुरु आहे. सोलापूर, नाशिक नंतर आज शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
यांनी औरंगाबदमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
पवारांनी पत्रकार परिषदे घेऊन, औरंगाबादमधील कोरोना स्थितीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांचं वय आणि ते राज्यभर फिरुन घेत असलेला आढावा, लातूर भूकंपावेळी पवारांनी घेतलेले निर्णय, याबाबत प्रश्न विचारलं.
त्यावर पवार म्हणाले, “माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 म्हणता”. पवारांच्या या वाक्याने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.