खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. या प्रकारानंतर महविकास आघाडीतील घटक पक्षांकडून नायडू यांच्यावर जोरदार टीकाकारण चालू होते. मात्र यावर आत व्यंकय्या नायडू यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देऊन आपले मत व्यक्त केले आहे.
“मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. त्यांचा अजिबात अनादर केलेला नाही” असे स्पष्टीकरण राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.
“मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच खंदा आणि जाहीर प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अजिबात अनादर केलेला नाही” असे ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
Always been a strong and vocal admirer of Chhatrapati Shivaji Maharaj and worshipper of Goddess Bhawani.
Reminded Members that as per conventional practice at the time of taking oath, no slogans are given.
No disrespect at all.
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) July 23, 2020