पुणे : राष्ट्रवादीत फुट पडली. अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडली. अन् त्यानंतर झालेल्या लोकसभेत पवारांनी अजित पवारांना इंगा दाखविला. अजित पवारांनी आपल्या पत्नीला लोकसभेत उभं केलं. तर पवारांनी आपली मुलगी सुप्रिया सुळेंना संधी दिली. वातावरण अजितदादांच्या बाजूने फिरणार, असं वाटत असतांना पवारांनी डाव पलटला आणि सुप्रिया सुळे १ लाख ५३ हजार मतांनी विजयी झाल्या. पक्षात बंडखोरी झाली, आता बंडखोरांना धडा शिकवायचाच असं पवार नेहमी म्हणताहेत. याचा पहिला भाग लोकसभेत पाहिला. आता दुसरा भाग विधानसभेत होणार.. आपल्याला फक्त आता राज्य हातात घ्यायचंय. असंही पवार म्हणतात. त्यामुळे आता पवारांचं लक्ष्य थेट अजित पवारांच्या बारामतीवर लागून राहिलंय. मात्र तब्बल ३० वर्षे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अजित पवारांचा पराभव करणं अवघडय. त्यामुळेच पवारांनी निवडणुकीच्या काही महिन्याआधीच बारामतीत मतांची पेरणी सुरू केलीय. त्यासाठी पवारांनी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या हेरलाय. त्याचाच हा आढावा…
हेही वाचा..“फुकटच्या गोष्टी करून कुणी कुणाला संपवू शकत नाही”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
राष्ट्रवादीत फुट पडली. तशी सगळी पवार मंडळी शरद पवारांच्या बाजूने उभी राहिली. यात विशेष करून अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी तर अजित पवारांवर उघडउघड टिका केली. त्याच श्रीनिवास पवार यांच्या मुलानं विधानसभेत अजित पवारांसमोर मोठं आव्हान उभ केलंय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार जिथे जिथे जातील, तिथे अगदी पवारांच्या बाजूने युगेंद्र पवार असायचे. याच काळात युगेंद्र पवारांनी अजित पवारांवर टिकाही केली. त्यांची भाषणंही अनेक ठिकाणी चांगलीच गाजलीत. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार बारामतीत ‘तुतारी’ वाजवणार अशी चर्चाय.
युगेंद्र पवार हे राजकारणात नवखं नाव
युगेंद्र पवार हे राजकारणात नवखं नाव. लोकसभेत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. याच काळात संपुर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढला. लोकांशी संवाद साधला. अडअडीचणी समजून घेतल्या आणि त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तब्बल ४८ हजारांचं लीड मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली. युगेंद्र पवार हे औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मुरलेलं नाव.. शरयू फाऊंडेशनच्या मदतीने अनेक उद्योगसमहू सांभाळलं, सामाजिक काम केलं, विद्या प्रतिष्ठानच्या भव्यदिव्य शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळलं. आता हेच नाव राजकारणाच्या पटलावर आलंय.
हेही वाचा…३० वर्षांचा माढ्याचा किल्ला यावेळी ढासळणार ? शरद पवारांची ‘तुतारी’ माढ्यात वाजणार ?
यातच ज्या आपल्या सख्या काकाने संघर्षाचा जो विस्तव पेटत ठेवलाय. तोच विस्तव पेटत ठेवण्यासाठी पुतण्याने काकांच्या विरोधात दंड थोपाटलंय. लोकसभेत प्रचार केलाच, पण आता विधानसभेसाठी युगेंद्र पवार प्रत्येक गावात जात आहेत. नव्या दमाची विविध जाती धर्माची पोरं सोबत घेतीलय. त्यांनी युथ विंग तयार करून पदांची वाटणीही केलीय. सभा, बैठका , मिळेल तसं, जमेल तसं लोकांशी संवाद साधाताहेत. ‘आपला दादा, युगेंद्र दादा’, अशी रिल्स सोशल मीडियावर दणक्यात सुरू आहेत. एकट्या बारामती नीरा पट्टाबद्दल बोलायचं झालं तर इकडे सुप्रिया सुळे कधी फिरकल्याच नाहीत. तिथे युगेंद्र पवार फिरू लागलेहेत. जिथं दिसेल, तिथं जाऊन युगेंद्र पवार आपली छाप सोडताहेत. एकंदरीत विधानसभेसाठी फुल्ल तयारी झालीय. यातच पवारांची साथ सोडून अजितदादा हिंदुत्ववादी भाजपसोबत गेल्यानं दलित, मुस्लिम आणि अप्लसंख्यांकांची मतं तुतारीकडे वळलीय. त्यात सहानुभूतीही पवारांच्या बाजूनीय.
अजित पवार दादांना हरवणं सोप्प नाहीय
मात्र सुनेत्रा पवार म्हणावा असा स्टॉंग कॅंडिडेटही नसल्याने लोकसभा एका बाजूला वळलीय. पण विधानसभेला रिंगणात असतील ते दस्तूरखुद्द अजित पवार..त्यांना हरवणं सोप्प नाहीय. गेल्या ३० वर्षांपासून अजिदादांनाही मतदारसंघ चांगलाच बांधून ठेवलाय. विविध ग्रामपंचायतचे पॅनेल, स्थानिक नेते, कार्यकर्ते यांचं स्ट्रॉंग नेटवर्क. प्रत्येक गावात ओळखी, स्थानिक स्वराज्य संस्था, बॅंका, तसेच जिल्हा परिषदा प्रत्येक ठिकाणी दादांनी आपलेच कार्यकर्ते पेरलेहेत. यातच विधानसभेलाही सत्तेच्या चाव्या स्वत:कडे ठेऊन आपली ताकद दाखवून दिलीय. त्यामुळे ही फाईट हलकी होणार नाहीय.
एका बाजूला अजित पवार अन् दुसऱ्या बाजूला शरद पवार.. एक जण आपल्या अस्तित्वासाठी पुर्णपणे कष्ट घेणार, जीव तोडून काम करणार. वाट्टेल ते करणार. अन् दुसऱ्या बाजूला आपल्या राजकीय करिअरचा शेवट गोड करण्यासाठी सगळी यंत्रणा, सर्व नीती कामी लावणार. एकंदरीत आगामी बारामती विधानसभेच्या निवडणुकीत घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारी वाजणार ? हे पाहणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..उद्धव ठाकरेंवर निवडणुक आयोगाची कारवाई ? नेमकं प्रकरण काय ?
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, राजकारण सोडून देतो,” अजितदादांचा सुप्रिया सुळेंना चॅलेंज