मुंबई : आगामी काही काळात मुंबई महापालिकासह राज्यात इतर महापालिका निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्याचबरोबर अलिकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर
शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदीजींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खुप मोठं आहे. त्यांना 150 देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघत आहे. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. असा टोला देखील त्यांनी शरद पवारांवर लगावला.
“राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
राज्यात येणाऱ्या महापालिका निवडणुका देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. मुंबईत आमचा महापौर असणार, पुण्यात आमचा महापौर असणार. महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार. कुठलीही निवडणुक येऊ द्या. नंबर एकचा पक्ष आमचाच असणार. असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला
दरम्यान, शरद पवार यांच्यावर टिका करताना म्हणाले की, ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडणुन येत नाहीत. ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत. असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खुप मोठे नेते आहेत. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- एकनाथ शिंदे नाना पाटेकरांच्या भेटीला..! म्हणाले, “नानांना भेटून आनंद झाला”
- संजय राऊतांची तुरूंगातून सुटका कधी होईल ? कार्यकर्त्यांना चिंता, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला
- शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”
- “आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
- नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं