मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह राज्यातील एकूण १३ मतदारसंघातील प्रचार आता थांबणार आहे. त्याआधी काल मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंच्या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. यावरूनच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा…“तर जय श्रीराम शिवाय यांना काहीच सुचत नाही”, जयंत पाटलांचा खोचक टोला
लोकसभा निवडणुकीतील तमाशा आपण पाहत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये यासाठी ही सगळी धडपड चालू आहे. शिवसेनेची (ठाकरे गट) महाविकास आघाडीबरोबर युती झाली आहे, असं सर्व प्रचारसभांमध्ये सांगितलं जातं. परंतु, मुंबईतील महाविकास आघाडीच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (शरद पवार गट) एकही कार्यकर्ता दिसत नाही. त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे नेते या तमाशात सहभागी असतील. असा टोला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
हेही वाचा…भाजपच्या या सहा राज्यात कमी होणार जागा, भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही
दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपाबरोबर (एकनाथ शिंदेंची शिवसेना) आहे. पण, निवडणूक झाल्यानंतर दुसरासुद्धा १०० टक्के भाजपाबरोबर जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो तुम्ही त्यांना मतदान का करताय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे”
हेही वाचा..“या हुकूमशहाचा विषाणूपासून देशाला वाचवायचे आहे”, ठाकरेंचा मोदींवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको”