मुंबई : येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे – चित्रा वाघ
किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी 800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत, असं सोमय्या म्हणाले.
धनंजय मुंडेविरोधात कोणतीही निवडणूक लढवणार नाही; करुणा मुंडेचा ‘त्या’ वक्तव्यांवरून यु-टर्न
सोमय्या म्हणाले की, सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने टेरर घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे. येत्या दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करणार असल्याचं ते म्हणाले. येत्या दहा दिवसात या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर आणणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इतकं टेन्शन का पसरवत आहेत. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Read also:
- शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप
- भाजप आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; कुटूंबही संपवण्याचा दिला इशारा
- विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांची माझ्यावर बोलायची लायकी नाही – राजू पाटील
- कोल्हापुरात सत्तारूढ गटातील ज्या नेत्यांमुळे पराभव झाला त्यांना किंमत चुकवावीच लागणार; विनय कोरेंचा इशारा
- पंतप्रधानांविषयी कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेपाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा – चंद्रकांत पाटील