पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरुन इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला. यानंतर न्यायालयाने इंदोरीकरांना येत्या 7 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली
समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरु असताना, आज मनसे नेत्याने भेट घेऊन, इंदोरीकर महाराजांशी चर्चा केली.
या भेटीनंतर अभिजीत पानसे म्हणाले, “एखाद्या छोट्या, अनावधाने केलेल्या वाक्यावरुन इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. त्यांनी माफीही मागितली आहे. इंदोरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे. शाळा चालवत आहेत, समाज प्रबोधनाचं मोठं काम विसरुन चालणार का? पक्ष, राजकारण यापलिकडे आपण पाहायला हवं” आज सदिच्छा भेट घेतली असून सरकारने याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले.