मुंबई : ‘मोदी सरकारने देशातील वैज्ञानिकांचे म्हणणे, त्यांची मतं सुद्धा ऐकली पाहिजेत आणि धोरण बनवण्याच्या बाबतीतली हट्टी मनोवृत्तीचा सध्या तरी त्याग केला पाहिजे. सरकारने धोरण बनवण्यासाठी विज्ञानावरही लक्ष केंद्रित करायला हवे, मात्र तसे होत नाहीये, त्यामुळे मला चिंता वाटते आहे, पण शेवटी माझे कार्यक्षेत्र किती, हे मी नक्कीच जाणतो. त्यामुळे मी राजीनामा देत आहे आणि या प्रकरणात आता काहीही बोलण्यासारखं उरलेलं नाही’, अशी प्रतिक्रिया देत, देशाचे वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील यांनी (रविवारी) भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे.
The resignation of Dr. Shahid Jameel, one of India’s best virologists, is really sad. Modi Sarkar has no place for professionals who can speak their mind freely without fear or favour.https://t.co/fnpDUdfeh4
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 17, 2021
नुकताच त्यांचा एक लेख न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला होता, ज्यात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. सरकार वैज्ञानिकांचा सल्लादेखील मान्य करत नसल्याचा आरोप त्यांनी या लेखात केला होता. दरम्यान, जामील यांचा तडकाफडकी राजीनामा सरकारसाठी मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे.
Read Also :
- आंदोलन थांबलं नाही! थांबणार नाही! मराठा आंदोलनात भाजप होणार सहभागी
- मराठी कलाकारांची उपासमार; देंवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमदार महेश लांडगे सरसावले
- “…तर उजनीसाठी रक्तही सांडू”, शिवसेना आमदाराची शिवगर्जना
- “पुन्हा एकदा तोडले का अकलेचे तारे”; उमा खापरेंची, रुपाली चाकणकरांवर टीका
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – महेश लांडगे