देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील काही जमीन व्यवहाराबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गृह खात्याला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर येथील झिंगाबाई टाकळी येथील 100 कोटींची जमीन रामदेव बाबा सार्वजनिक समिती या खाजगी कंपनीला देण्यात आली होती. ही जमीन पोलीस खात्याची आहे. 2018 साली तत्कालिन सरकारने ही जमीन खाजगी संस्थेला दिली होती.
याशिवाय आणखी काही एकर जमीनी इतर संस्थांना सरकारच्या काळात देण्यात आल्या होत्या. या संदर्भातील तक्रार अॅड. सतीश उके यांनी नाना पटोले यांच्याकडे केली होती.
जमिनी खासगी संस्थांना वाटण्याची ही प्रकरणे अत्यंत गंभीर असून, या तक्रारी गृहमंत्र्यांकडे चौकशी आणि पुढील कारवाईसाठी पाठवत असल्याचे, नाना पटोले यांनी सांगितले.