नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. भंडारा जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा प्रचार सुरु आहे. यावेळी एका प्रचारसभेला संबोधित करत असताना नाना पटोले यांनी थेट मोदींना मारायची भाषा केली. मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव
नाना पटोलेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत.
ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
आता काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. त्यामुळे कोणीतरी सांगेल का की काँग्रेस पक्षामध्ये नेमकं चाललंय तरी काय ? कधीकाळी स्वातंत्र्य लढ्यात असलेला हा पक्ष असा रसातळाला का गेला आहे ? सत्तेसाठी आता काहीही करणारा का ? अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंच्या वक्तव्यावर दिली आहे. काँग्रेस पक्षाला आता लोकशाहीमध्ये असणारा पक्ष म्हणायचे की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते असं देखील फडणवीसांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Read also:
- मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे आक्षेपार्ह वक्तव्य
- ५ वर्ष न केलेल्या कामाचं अपयश ते लुंगीमागे लपवत आहे; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंच्या डान्सवर प्रतिक्रिया
- मेट्रोची पाहणी करायला शहरात शरद पवार आले, महापौरांना नाही बोलवले
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”;
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला