मुंबई: मुंबै बँक निवडणूक प्रकरणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचा अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज देखील फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना आता या प्रकरणी कधीही अटक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कांयदे यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.
मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
मुंबै बँक निवडणूकीचा मुद्दा काल विधानसभेत देखील चांगलाचं गाजला. सत्ताधारी पक्षांकडून प्रवीण दरेकर यांच्यावर कडाडून विरोध दर्शवण्यात आला तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकरांना पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेतही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कांयदे यांनी ही हा मुद्दा उपस्थित केला.
मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
मनिषा कांयदे सभागृहात बोलत असताना त्यांनी उपाहासत्मक टिप्पणी केली. त्या म्हणाल्या की, ‘विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेली दोन दिवस सभागृहात दिसले नाहीत. दरेकर यांना अटक झाली, की ते फरार आहेत याची माहिती सभागृहाला द्यावी. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप नोंदवत सभागृह दणाणून सोडला.
हे पण वाचा मुंबै बँकेत घोटाळा: अजित पवारांच्या जवळचे ६ संचालक सामील – प्रवीण दरेकांचा दावा
दरम्यान, मुंबै जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मजूर आणि नागरी सहकार बॅंक अशा दोन्ही ठिकाणांहून प्रवीण दरेकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्या दोन्ही निवडणुकीत प्रवीण दरेकर निवडून आले होते. मात्र निवडणुकीच्या निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला होता.
हे पण वाचा
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?