मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विशेष भाषण झाले. भाषणादरम्यान अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने मोदींचा गोंधळ उडाल्याचा व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून काँग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदींची पाठराखण केली आहे.
पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो; नाना पटोलेंचा यु-टर्न
रोहित पवार यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. ‘इकॉनॉमिक फोरम’च्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना Teleprompter बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात. पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.
एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 18, 2022
एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुट्टी नाहीच; न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
- सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले – अमृता फडणवीस
- भाजप आमदाराचा निष्काळजीपणा; कोरोना पॉझिटीव्ह असताना आंदोलनात सहभाग
- नाना पटोलेंना मोदींबद्दलच वादग्रस्त वक्तव्य भोवणार? भाजपची पोलिसांत तक्रार दाखल
- मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत – संजय राऊत