मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार आरोप करत अमरावती शहरातील दंगल ही माजी मंत्री अनिल बोंडे आणि त्यांच्या साथीदारांनी पेटविली, असा घणाघात केला. अमरावती येथे नियोजन पद्धतीने शहरात दंगल भडकवली गेली. याची चौकशी पोलिस करत आहेत. मुंबईतून पैसे पाठविण्यात आले असा आरोपही नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
‘तुम्ही फक्त दिवस मोजा’; शरद पवारांचा विरोधकांना थेट इशारा!
जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही, असा दावा त्यांनी केला. मोर्चा काढण्यासाठी भाजप नेत्यांनी परवानगी मागितली आणि भाजपने दंगल घडविली. त्यासाठी मुंबईतून पैसे पाठविण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.
परळीची जनता हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं – पंकजा मुंडे
मालेगावमधील दंगलीत राष्ट्रवादीचा हात असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे काही ठिकाणी बंद पुकारला गेला. ज्याला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकही झाली. अशा सर्व लोकांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये देखील अशीच अप्रिय घटना घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र त्यात तथ्य नाही. मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक देखील गेले होते. त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत असा खुलासाही नवाब मलिक यांनी केला.
Read Also :
-
पेट्रोल-डिझेलची किंमत अमेरिका ठरवते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा जावईशोध
- समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट
- आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- ‘आधी तुरुंगातील जेवण घ्या’, अनिल देशमुखांना घरचे जेवण देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली