पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
मनसे मध्ये निस्वार्थी कार्यकर्ते आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांची ऋणी राहीन, बदल कोणात घडत नसेल तर मी माझा बदल केलेला आहे. 14 वर्ष मी काम केले आहे, मनधरणी अनेकांनी केली. नवीन पक्षात जाणार हे अद्याप मी ठरवलेले नाही, अनेकांच्या ऑफर आलेल्या आहेत, निर्णय लवकरच जाहीर करणार आहे. राज ठाकरे माझे दैवत होते आणि आहेत. 14 वर्ष काम करत असताना मला तारेवरची कसरत करावी लागली.
तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
माझ्यामुळे पक्षाला त्रास होणार असेल, तर मी माझा निर्णय घेतलेला बरा आहे. 14 वर्षात पक्षाने मला खूप काही दिले आहे. माझा वाद यावरुन नाही की मला काय दिले आणि काय दिले नाही माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी राजीनामा दिला आहे. माझ्या काम करण्याच्या पद्धतीसह जे मला स्वीकारतील त्या पक्षात मी जाणार आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना समोर आहे. मला जर जायचं असतं तर 2019 ला मी निर्णय घेतला असता.
तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
माझ्यावर ही वेळ का आली याची कल्पना तुम्हालाही माहिती आहे. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. भाजपची अद्याप ऑफर नाही. मी बेधडक होते आणि आहे. पक्ष सोडण्याच्या भावना इमोशनल आहेत. रिकामटेकड्या नेत्यांमुळे रुपाली पाटीलवर ही वेळ आली त्यांना योग्य वेळी उत्तर देईल, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. फोन आल्यावर बघू, राज ठाकरेंना भेटायला कधीही आवडेल.
Read Also :
- ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- हिंदू वोट बँकेचं माहित नाही मात्र शिवरायांनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं – सजंय राऊतांचा टोला
- मनसेतील ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले ‘असं’ काही…
- भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
- राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश