पुणे: महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून आधीच राजकीय वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’ची घोषणा केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात शिंदे यांनी हे विधान केले, ज्याचे आता राजकीय वर्तुळात अनेक अर्थ लावले जात आहेत.
हेही वाचा…पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”
‘जय महाराष्ट्र’ नंतर ‘जय गुजरात’चा नारा
आज पुण्यात जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी “धन्यवाद, जय महाराष्ट्र” म्हटले आणि ते निघाले होते. मात्र, खाली वाचून त्यांनी पुन्हा “जय गुजरात” असा नारा दिला. पुण्यातील कोंढवा भागात गुजराती समाजाने हे सेंटर उभारले आहे, आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदेंनी हा नारा दिल्याने याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
अमित शाह यांच्यासाठी शेर, राजकीय अर्थांची चर्चा
एकनाथ शिंदे यांनी यावेळी अमित शाह यांच्यासाठी एक शेरही ऐकवला:
“आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,
दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है,
आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है,
आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है.”
या शेराचेही राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. शिंदे यांच्या या विधानामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रात आता ‘जय गुजरात’च्या घोषणेवरून नवे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा कृषिमंत्र्यांना घेराव: “ओसाड गावच्या पाटीलकी” विधानावरून बाचाबाची!
ठाकरे पिता-पुत्राला सरनाईकांचे जेवणाचे निमंत्रण: शिंदे गटात चर्चांना उधाण!
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राणेंचा निशाणा: ‘स्वार्थासाठीची धडपड!
चित्रा वाघ संतापल्या, आरोपीला अटक करा! पुण्यात कुरिअर बॉयच्या वेशात येऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार