औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. तत्पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून वातावरणनिर्मिती केली जात आहे. या बॅनरवर जय श्रीरामचा नारा दिला आहे. तसेच राज ठाकरे यांना श्रीरामाची मूर्ती भेट देतानाचा फोटोदेखील लावण्यात आलेला आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात मनसेने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार का, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी औरंगाबादेत येत आहेत. या दरम्यान ते जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढवा घेतील.
देशात कायद्याचं राज्य आहे की नाही ? राऊतांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त सवाल
राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. त्यात 14 डिसेंबर रोजी ते औरंगाबादेत येण्याचीही घोषणा करण्यात आली होती. तत्पुर्वीच शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मोठी खेळी करत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यामुळे आता मराठवाड्यातील मोर्चेबांधणी हे राज ठाकरे यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.
Read Also :
- नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका..
- लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
- येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
- गृहमंत्री वळसे पाटलांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडली; 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
- सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला; शब्दकोशातील ‘त्या’ शब्दाचा अर्थ दाखवला..