मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हा रस्त्यावर झोपून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांनी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने विदर्भात मोठ्या नेत्याचा भाजपला रामराम..!
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेतून अतुल खुपसे बाहेर पडले होते. त्यांनी जनशक्ती संघटना स्थापन केली. त्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या संघटनेचे काही कार्यकर्ते आज गनिमी काव्यानं अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले. त्यांनी परब यांच्या घरासमोर निदर्शनं केली. इतकंच नाही तर परब यांच्या निवासस्थानावर शाई फेकण्याचाही प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरानंतर परब यांच्या निवासस्थानासमोर साफसफाईही करण्यात आली.
शरद पवारांसोबत चार तास चर्चा केल्यानंतर एसटी संपावर अनिल परब यांचं मोठं विधान
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. मात्र, हा उद्रेक योग्य नाही. सरकारनंही लोकांच्या मानसिकता लक्षात घ्यावी. एसटी कर्मचारी आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करत आहे. अन्य एसटी कामगारही राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. सरकारलाही हेच हवं आहे की, उद्रेक व्हावा. त्यातून हा संप चिरडून टाकला जाऊ शकेल. त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. तसंच जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाशी एसटी कर्मचारी वा आपला संबंध नसल्याचंही पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Also :
- शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात
- पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
- ‘ओह माय गॉड! क्रांती जी’ म्हणत मलिकांनी क्रांती रेडेकरांचे चॅट केले व्हायरल; चॅटमध्ये होते ‘हे’ गुपित
- सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी मात्र सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेतं – पंकजा मुंडे
- नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी ठाकरे सरकारची अवस्था झाली – प्रीतम मुंडे