सातारा: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातारा जिल्ह्यात स्थित असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी साखर कारखाना होता. मात्र अडचणीच्या काळात महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव करण्यात आलेला होता. त्यानंतर कारखाना खासगीरित्या विकत घेतला होता.
हे पण वाचा, श्री छत्रपती शाहू साखर कारखाना देशात ठरला अव्वल; गुणवत्तापूर्ण साखर उत्पादनासाठी मिळाली ‘ही’ मानांकने
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
ED has attached assets of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana (purchase price of Rs. 65,75,00,000/- in the year 2010) situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra under PMLA in a case related to Maharashtra State Co-operative Bank.
— ED (@dir_ed) July 1, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे राजेंद्र कुमार धाडगे हे जरंडेश्वर कारखाना चालवत होते. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालकांनी महाराष्ट्र राज्य सहकार बँकेकडून कर्ज घेतले आणि नंतर ते बुडवले. त्यामुळे बँकेकडून कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. या साखर कारखान्याची त्या काळात अत्यंत कमी भावात विक्री करण्यात आली होती. यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा दाखल केला होता.
हे पण वाचा, जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि इतर ६५ जणांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान ददेखील दिल होतं. २०२९ मध्ये या सर्व घडामोडींनंतर अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील अजित पवारांचा राजीनामा मंजूर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे.
हे पण वाचा, “जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..