पुणे : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीने मोठी कारवाई केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आणि त्यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या, साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज यासंदर्भात अजित पवारांनी, पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी
“मुंबईतील सुंदरबाग सोसायटीने २००७ मध्ये यासंदर्भात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, कारखान्यामुळे त्यांनी ठेवलेल्या ठेवी अडचणीत आल्यात, असं या याचिकेत म्हटलं होतं. यावर न्यायालयाने, साखर कारखान्यांना १ वर्षाची मुदत द्या, अशी सूचना केली होती. वर्षभरात पैसे थकवले, तर कारखाना विक्रीला काढा, असे निर्देशही न्यायालायने दिले होते. यांनतरही पैसे दिले न गेल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीररित्या १४ कारखान्यांची विक्री झाली. यात अनेक कंपन्या होत्या. त्यांनी इतर कारखाने घेतले. या कारखान्यासाठी सर्वात जास्त, ६५ कोटी ७५ लाखांची बोली ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने लावली आणि तो विकत घेतला,” असं त्यांनी सांगितलं.
ED has attached assets of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana (purchase price of Rs. 65,75,00,000/- in the year 2010) situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra under PMLA in a case related to Maharashtra State Co-operative Bank.
— ED (@dir_ed) July 1, 2021
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
“यांनतर बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांनी ‘गुरु’शी संपर्क साधून नंतर तो चालवायला घेतला. ३० ते ३५ वर्षांसाठी त्यांनी कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. त्यांना पहिल्याच वर्षी जवळपास ४-५ कोटींचा तोटा झाला. मग जरंडेश्वर शुगर मिल नावाने त्यांनी जी कंपनी सुरु केली, ती त्यांनी विकायला काढली. आम्ही २०१६-१७ मध्ये कर्ज विस्तार वाढ करण्यासाठी त्यांनी सगळ्या रितसर परवानग्या घेतल्या आणि माझेच एक नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी ती विकत घेतली. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असला, तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. त्यांनाही दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी तोटा झाला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आलं असून, ते फेडलंही जात आहे,” असं देखील त्यांनी सांगितलं.
मोठी बातमी! ईडीने केली अजित पवारांच्या निकटवर्तीयावर मोठी कारवाई
“दरम्यान, ईडीकडून गुरू कमॉडिटीसंदर्भात अजूनही काही चौकश्या सुरू आहेत. ती सुरु असताना कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने टाच आणली आहे. त्यामुळेच त्यांनी या कारखान्याची जप्ती केली आहे. मात्र, सध्या हा कारखाना जरंडेश्वरद्वारे चालविला जात आहे. गुरू कमोडिटीचे मुंबईतील ओंकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांच्या कंपनीशी माझा दुरान्वये संबंध नाही. पण, कारवाई झाली असल्याची गोष्ट खरी आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याआधी सीआयडीनेही यासंदर्भात चौकशी केली, मात्र त्यातून काही निष्पन झालं नाही. आता वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाईल,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
Read Also :
- “मी गेलो तर बला टळेल असं काही लोकांना वाटतं, पण…” फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा
- “केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळणे; हा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का”
- देवेंद्र फडणवीस व अमित शहांची भेट म्हणजे २०२४ची रणनीती; रावसाहेब दानवेंनी सांगितले रहस्य
- “एकाच का? ४३ कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे”- राजू शेट्टी
- अधिवेशनाचा कालावधी वाढवणार नाही; राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला ठाकरेंचे उत्तर