राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन दिग्ग्ज नेत्यांचा आज म्हणजेच २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. संपूर्ण राज्यभरातून या नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव पडत आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांना जयंत पाटील यांनी इतरांप्रमाणे सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, पाटील यांनी फडणवीस यांना शुभेच्छा देताना कोपखळी मारली आहे. ”महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ‘राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा’.” असे जयंत पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ५० वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत फडणवीस यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. सध्या राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जयंत पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छाची चर्चा जोरदार सुरू आहे.