IMPIMP
Jayant Patil's strong leadership in our party for the post of Chief Minister, Rohit Pawar's big statement Jayant Patil's strong leadership in our party for the post of Chief Minister, Rohit Pawar's big statement

“मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात ‘जयंत पाटील’ सक्षम नेतृत्व”, रोहित पवारांचा मोठं विधान

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चार जागांसाठी विधानपरिषदेची निवडणुक होत आहे. त्यावरून सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून थोडा कॉंग्रेस आणि ठाकरे गटात गोंधळ झाला होता. परंतु तो आता मिटला आहे. यातच काही महिन्यांवर विधानसभेच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडीकडून जोरदार हालचाली सुरू केल्या जात आहेत. यातच शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी याबाबत मोठं भाष्य केलंय.

हेही वाचा..“अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार”, उपोषण स्थगित पण… 

येत्या काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. कुठलं पद कोणाला द्यायचं? हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यामध्ये पवार साहेब, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेत. ते निर्णय घेतात. महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षातील बघायचं झाल्यास, आमच्या पक्षात खूप अनुभवी नेते आहेत. आमच्या पक्षात सर्वात जास्त अनुभवी नेता आज कोणता असेल तर जयंत पाटील साहेब आहेत. त्यांनी अध्यक्ष म्हणून पाच ते सात वर्ष पद सांभाळले आहेत. ते नक्कीच सक्षम पद्धतीने काम करू शकतात. असं रोहित पवारांनी म्हटलंय.

हेही वाचा..अजितदादाला घेतल्याने संघ बाटला असे RSS वाटतं, परंतु ते ऐकून दादांना काय वाटतं ? ते ऐकायचं आहे 

पुढे बोलतांना जयंत पाटील यांच्यासह अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड साहेब, राजेश टोपे साहेब असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात अनुभवी नेते आहेत. जर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला संधी मिळाल्यास शरद पवार यांच्यातील नेते निवडतील. जर पवार साहेबांनी ठरवले तर महाविकास आघाडीमध्ये महिला मुख्यमंत्री होऊ शकते. त्यामुळे आज मुख्यमंत्री कोण होणार ? यापेक्षा लोकांच्या हिताची कामे करून लोकांना केंद्रबिंदू करावे लागेल. असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या नावाखालीच लढविली जाणार असून उद्धव ठाकरे हेच आघाडीचे नेतृत्व करतील. असा संदेश कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिलाय. सध्या होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणूकीत आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने करू नका, असा सबुरीचा सल्लाही देण्यात आल्याचे समजत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

हेही वाचा..नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

हेही वाचा…“बिल्डर पुत्राला पुन्हा रेड कार्पेट टाकून बाहेर काढण्यासाठी …”पुणे अपघातबाबत धंगेकरांचं मोठं संकेत 

हेही वाचा…अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचे नुकसान झालं का ? बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..राष्ट्रवादीने दावा ठोकल्यानंतर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ठाम, म्हणाल्या..