नागपूर : दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहात मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भुखंड वाटप व गैरव्यवहाराबद्दल आम्ही उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा प्रयत्न होत होता. म्हणूनच मी सदनात उभे राहून असा निर्लज्जपणा करू नका, असे शिंदे फडणवीस सरकारला उद्धेशून म्हणालो. मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याच्या व वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने मी असे विधान अध्यक्षांना उद्धेशून बोलल्याचा बनाव केला व मला हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. असं जयंत पाटील यांनी निलंबणाच्या कारवाईवर स्पष्टीकरण दिलं आहे.
जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे . जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, राज्यातील तरूणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. असंही ते म्हणाले.
राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
तसेच राज्य सरकारच्या या हुकूमशाही कृतीचा मी निषेध करतो. राज्यातील तरूणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार. असं म्हणत बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भुषण, छत्रपती शिवाजी महाराज की जय असंही त्यांनी म्हटलं असून शिंदे सरकारला इशारा दिला आहे.
“दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
दरम्यान, जयंत पाटलांच्या निलंबणाच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. आज मुंबई आणि ठाण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलने करण्यात आली. तर उद्या संपुर्ण महाराष्ट्रात राहुल नार्वेकर यांचा निषधार्थ आंदोलनाची हाक राष्ट्रवादीने पुकारली आहे.
Read also
- “जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
- “मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
- जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
- “या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
- पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली