मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष संपता संपत नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवाब मलिक आणि वानखेडे हे एकमेकांवर सातत्याने आरोप करत आहेत. नवाब मलिक रोजच्या रोज वानखेडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून त्यांना अडचणीत आणत आहेत.
‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’; मलिकांचा अजित पवारांना राजकीय सल्ला
आज मध्यरात्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटवरुन निशाणा साधलाय. मलिक यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट केला असून हा फोटो निकाहच्या वेळेच्या असल्याचा दावा करत फोटोमधील व्यक्ती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय.
कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
यापूर्वी देखील नवाब मलिक यांनी वानखेडेंचे फोटो शेअर केलेले आहेत. यापूर्वीही नदेखील समीर वानखेडे यांच्या लग्नाचा निकाहनामा, पहिल्या लग्नाच्या वेळेचे फोटो ट्विट करुन वानखेडे यांनी मुस्लीम असल्याचं लपवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाअंतर्गत आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे. याच आरोपांचा पुरावा म्हणून आता नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा कथित स्वरुपामधील निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना फोटो ट्विट केलाय. “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, असं कॅप्शन देखील या फोटोला देण्यात आलं आहे.
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश; केंद्र आणि राज्य सरकारने दिले भेटीचे निमंत्रण
या फोटोमध्ये डावकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे असल्याचा दावा करण्यात येतोय. तर या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती मुस्लीम धर्मगुरु असून फोटोत दिसणारे वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा करण्यात आलाय. फोटोमध्ये जी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय तिने मुस्लीम बांधव घालतात त्याप्रमाणे डोक्यावर गोल टोपी घातल्याचं दिसत आहे. मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विट केलेला हा फोटो व्हायरल झाला असून काही तासांमध्ये तीन हजारांहून अधिक वेळा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. मागील महिन्यामध्येच समीर वानखेडे यांनी आपण मुस्लीम पद्धतीने विवाह का केला यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं होतं.
Read Also :
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’; सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर
- रत्नागिरीत राणेंच्या पॅनलचा सुपडा साफ; जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या सामंतांचा वरचष्मा
- कृषी कायदे रद्द करून मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला; देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमने
- ‘त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार
- अजित पवार आणि अण्णा हजारे येणार एकाच व्यासपीठावर; राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या