मुंबई : भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या. उद्यापासून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आले आहे. त्यानंतर ९ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे कोळंबकरच कायमस्वरूपी अध्यक्ष राहणार की नवा अध्यक्ष निवडला जाणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कालिदास कोळंबकर यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवनावर आज त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सात ते आठ डिसेंबरला राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. सात, आठ आणि नऊ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान कोळंबकर हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
READ ALSO :
हेही वाचा…गृहमंत्रीपदावरून खरचं रस्सीखेच आहे का ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाले..”
हेही वाचा…“मोहित कंबोज आता मुंबईतील खंडणीखोर होईल”, गजाभाऊचा आणखी एक व्हिडीओ आला समोर
हेही वाचा..“एक तर तु राहशील नाहीतर मी,” ठाकरेंच्या विधानावर फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर..! म्हणाले…
हेही वाचा…संसदेत कॉंग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली सापडलं नोटांचं बंडल, चौकशी सुरू
हेही वाचा…मोठी बातमी..! हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती