मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल याच्याविरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाने दिले आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कंगनाने शिवसेनेची पप्पूसेना अशी खिल्ली उडवत, माझी एवढीही आठवण काढू नका, मी लवकरच तेथे येईल अशी मिश्किल टिप्पणी देखील कंगाने केली आहे.
Who all are fasting on Navratris? Pictures clicked from today’s celebrations as I am also fasting, meanwhile another FIR filed against me, Pappu sena in Maharashtra seems to be obsessing over me, don’t miss me so much I will be there soon ❤️#Navratri pic.twitter.com/qRW8HVNf0F
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 17, 2020
कंगनाने ट्विट केले की, नवरात्रीचा उपवास कोण-कोण करतंय? मीही उपवास करतेय आणि आजच्या पूजेनंतरचे हे फोटो. दरम्यान, माझ्याविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पप्पू सेना माझ्यामागे वेडी झालीये. माझी एवढी आठवण काढू नका. मी लवकरच तिकडे येणार आहे.
दरम्यान, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप कंगानावर करण्यात आला आहे.