अहमदनगर: महाराष्ट्रात सध्या साखर कारखान्यावर ईडीची वक्रदृष्टी लागलेली आहे. कोणत्याही कारखान्याची कधीही चौकशी होऊ शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसत आहे. अण्णा हजारे, माणिकराव जाधव , राजू शेट्टी आणि विरोधी पक्षाने सहकाराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र या सर्व गोष्टींना आणि कारवायांना काही साखर कारखाने अपवाद ठरत आहेत. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या आणि विद्यमान चेअरमन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी बजावत आहे.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
कारखाना व्यवस्स्थापनानें सर्व व्यवहार पारदर्शक ठेवलेले आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच इतरही संबंधित घटकांचे सर्व देणे वेळेवर चुकते करून केंद्र शासनाच्या १ जुलै २०१७ च्या जीएसटी करप्रणालीप्रमाणे सर्व करांची रक्कम केंद्र शासनाला नियमितपणे अदा करून संबंधित सर्व रिटर्न वेळेत दाखल केलेले आहेत. केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कामाची दखल घेऊन कारखान्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल प्रशस्तिपत्रक दिल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
सहकारी साखर कारखानदारीपुढे अनके आव्हाने आहेत. २०१६ साली परिस्तिथी अत्यंत बेताची होती आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर उसाची टंचाई निर्माण झालेली होती. अशा परिस्थितीवर मात करत आमदार आशुतोष काळेंच्या खांद्यावर कारखान्याची जबाबदारी आली. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांचे नेहमीच हित जपणाऱ्या माजी खासदार यांच्या आदर्श विचारांवर कारखान्याच्या अत्यंत जबाबदारीने कारभार करून त्यांनी आपल्या व्हिजनरी नेतृत्वाच्या जोरावर तीनच वर्षांमध्ये कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे.
हे पण वाचा,
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील