मुंबई : भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करूणा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी जाहीर केलं होतं. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा दावा केला होता. यानंतर राजकारण चांगलच तापलं होतं. यानंतर मुंडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व आपण भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच असं ठाम पणे सांगितले आहे.
“केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यापुढे मी कशा प्रकारे काम करू याबाबत चर्चा करण्यासाठी आले होते. दिवस-रात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी फिरत आहे. मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार अशी घोषणा केल्यानंतर माझ्यावर खोट्या केसेस केल्या जात आहेत. माझा अधिकार आहे की मी पण भगवान गडावर मेळावा घेऊ शकते. तो सामाजिक मेळावा असून तो कोणत्याही प्रकारचा राजकीय नाही, असं करूणा मुंडे म्हणाल्या.
“महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
आठ दिवसांपुर्वी माझ्यावर हल्ला झाला. मात्र या बाबत अजुन काही बोलले नाही. उत्तर कोल्हापुरमध्येही माझ्यावर हल्ला झाला होता, वारंवार धमकी दिली जात आहे. माझ्या जिवाला धोका आहे. मला दाबण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. या सर्वामध्ये धनंजय मुंडे आहेत, असा आरोप देखील करूणा मुंडे यांना केला आहे.
“मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
माझ्या जिवाला धोका आहे, त्यामुळे मला पोलीस संरक्षण हवं आहे, याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याची चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं म्हणत. दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं व मेळाव्याची शोभा वाढवावी अशी माझी इच्छा आहे. जनतेसाठी खुप काही मुख्यमंत्री करत आहेत तसेच माझ्यासाठी ही त्यांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असं माझं मत आहे, असं करूणा मुंडे म्हणाल्या.
Read also
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा