पुणे : कात्रज चौकामध्ये एका खाजगी प्लॉटवर अज्ञात व्यक्तीनी कात्रजचा खून झाल्याचा वीस बाय 50 चा मोठा फ्लेक्स लावला आहे. यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे कात्रज येथील राजकारण तापत आहे अशी चर्चा सुरू आहे. हा फ्लेक्स का लावला कोणी लावला याच्यामागे काय कारणे आहेत, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज गाव परिसर भागाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
धनंजय मुंडेंना पुढील 10 निवडणुकांमध्ये परळीत कोणीही रोखू शकणार नाही – जयंत पाटील
मागील आठवड्यामध्ये कात्रज येथील उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथील उड्डाणपूलाचे उद्घाटन केले होते. कात्रज कोंढवा रोडवरून देखील या भागात मोठे राजकारण सुरू आहे. या फ़्लेक्समुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील भागात उद्भवू शकतो. या भागात विकास कामे सुरू असले की राजकारण होते हा या भागाचा राजकीय इतिहास आहे, त्यामुळेच कात्रज कोंढवा रस्ता असेल किंवा कात्रज तळे असेल विकासापासून वंचित राहिले आहे.
Read Also :
- नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार; चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच
- काँग्रेसचे नेते मेले होते, उद्धव ठाकरेंनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत – आमदार जैस्वालाच वक्तव्य
- तळेगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदरवारांची चाचपणी सुरू; महाविकास आघाडी पॅटर्न राबविणार का?
- शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा
- परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडी चौकशी; स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलींची घातली शपथ