माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरांवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शहा यांनी ट्विटवरून देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून शुभेच्छा देताना, “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा” असे म्हटले आहे.
शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही अशाच उत्साहाने आणि समर्पित भावनेने महाराष्ट्र राज्यातील लोकांची सेवा करत राहावी. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”
Warm birthday greetings to Shri @Dev_Fadnavis, the former Chief Minister of Maharashtra. May you continue to serve the people of Maharashtra with same passion and dedication. I pray to almighty for your good health and a long life.
— Amit Shah (@AmitShah) July 22, 2020