मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. राज्यापालांनी 2 जुलै रोजी अधिवेशन घेण्याचं सांगितलं असून त्यात ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. त्याआधी विधान सभा अध्यक्षांसाठी शिंदे गटाकडून दिपक केसरकर तर भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
गेल्या एक ते दोन वर्षापासून विधान सभा अध्यक्षांची निवड रखडलेली होती. याकाळात विधानसभा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी कारभार सांभाळला होता. अशातच आता शिंदे सरकार अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. यासंदर्भात तात्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सर्वाेच्च न्यायलायत केली होती. मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 11 जुलै रोजीच होणार आहे.
15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
शिंदे गटातील दिपक केसरकर विधान सभा अध्यक्ष झालेत तर बंडखोर 16 आमदारांवरील निलंबणाची कारवाई टळू शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार असून शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांच्या नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे. तसेच विधिमंडळातील दिर्घ अनुभव असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील सरकारच्या काळात जवळपास 5 वर्ष विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी संभाळली होती.
फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करता येणार नाही. असं म्हणत शिंदे गटाला दिलासा तर शिवसेनेला धक्का मिळाला आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना इडीची नोटीस आली असून आज ते इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच संजय राऊतांना इडीची नोटीस आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Read also
- “पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
- महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
- एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”