कराड : ‘कोल्हापूरला जाऊन मुश्रीफ यांचे आणखीन काही घोटाळे बाहेर काढणार,’ असे म्हणणाऱ्या सोमय्या यांना, पोलिसांकरवी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेला. त्यांनतर या कारवाईला झुगारून त्यांनी रेल्वेने कोल्हापूर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कराडमधेच गाठून थांबण्याची विनंती केली. त्यांनतर सोमय्यांनी कोल्हापूरचा दौरा रद्द केला आणि कराडमध्येच पत्रकार परिषद घेऊन लवकरच मुश्रीफ यांचा तिसराही घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार – किरीट सोमय्या
तसेच, ‘गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाला आहे. आता हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध?’ असा सवाल उपस्थित करत, ‘मला मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडी सरकार आणि पोलिसांना न जुमानता बाहेर काढणार,’ असे ते म्हणाले.
२ काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर येणार! पाटलांच्या विधानाने खळबळ
‘मागच्या वर्षी कुठल्याही पारदर्शकतेशिवाय मुश्रिफांकडून हा कारखाना ‘ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला देण्यात आला. पण ‘ब्रिक्स इंडिया कंपनी’ ही बेनामी कंपनी आहे. मुश्रीफांचे जावईच या कंपनीचे मालक आहेत. त्यामुळे, या कंपनीचीही तातडीने चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. मुश्रीफांनी कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या नावाने देखील काही पैसे उभारले आहेत. त्यांच्या या घोटाळ्यासंदर्भात आपण ईडीकडे अधिकची कागदपत्रे देऊन, उद्या तक्रार करणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्यावर गृह मंत्रालयाची कारवाई, मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही – संजय राऊत
‘कारखान्यातील ९८ % शेअर्स हे बेनामी कंपनीचे आहेत,’ असा आरोप सोमय्यांनी केला. ‘साखर कारखाना चालवण्याचा कसलाही अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी कशी दिली गेली? कदाचित हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. मुश्रीफांच्या या घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी, अशी आमची मागणी असून, आपण पुढच्या आठवड्या पुन्हा भेटू, तेव्हा हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला.
Read Also :
- भाजपात प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटीलांनी मला ऑफर दिलीयं; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्या केसालाही धक्का लावला तर दुसऱ्या दिवशी सरकार पाडेल – सोमय्या
- किरीट सोमय्याला कराडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात; रेल्वे स्थानकावर केली कारवाई
- भाजप सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही!
- *४ दिवस-४ दौरे, सोमय्या करणार ‘या’ नेत्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?