राजयात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे, त्यातच राज्यातील सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारलं जात आहे. याविरोधात आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
किरीट सोमय्या यांनी लिहिले की, मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना विनंती करतो की, ही बनवा बनवी थांबवा आणि खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल आकराणाऱ्यांविरोधात प्रत्यक्ष कृती करा. महाराष्ट्र सरकारला आणि महापालिकेला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, त्यांनी फक्त बेड चार्जेस निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना अपारदर्शक, अव्वाच्या सव्वा बिल आकारायला मुभा दिली आहे, त्यांनी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
now ₹18.8 lac bill by a private hospitaI. I once again Requested Maharashtra Health Minister & BMC Commissioner to correct Government Order, to stop Exploitation, High Bills, in name of PPE, COVID Management, Consultancy Charges by Few Private Hospitals @Dev_Fadnavis @mybmc pic.twitter.com/T19tMmoMIg
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 21, 2020