मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम काळजीपूर्वक बघितला. यावेळी बाळासाहेब किंवा स्वत:च्या आईचे नाव घेतले नाही. मागच्या वेळी अनेकांनी बाळासाहेबांचे तर कोणी आपल्या आईंचे नाव घेतले होते. तसेच यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेतले नाही, ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे. असा सवाल मुंबईच्या माजी महौपार आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
“योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावर त्या बोलत होत्या. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता त्याच राठोड यांना पुन्हा एकदा मंत्री करण्यात आलं आहे, त्यावेळी भाजपनेही रानं उठवलं होतं. चित्रा वाघ यांनी तर आभाळ पातळ एक केलं होतं. मात्र आता संजय राठोड यांना मंत्री कऱण्यात आलं आहे. त्यामुळे तेव्हा बडबड करणारे पोपट आता कुठं गेले आहेत. असंही त्या म्हणाल्या.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
आम्ही किती संवदेशनशील आहोत, याचं एक चित्र अलिकडेच निर्माण केलं गेलं होतं. मात्र, आता तो भोपळा फुटला आहे, यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली. त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे. असं म्हणत पेडणेकर यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.
TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
Read also
- “भाजपला ‘गॅंग ऑफ वासेपुर’ ही उपमा देणारे महोदय आता भाजपमध्ये विसावलेय”
- “उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा
- “शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”