कोल्हापुर: कोल्हापुरात आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मोठी टक्कर आहे. जिल्हापरिषद निवडणुकीसाठी आता अवघे चारच दिवस उरलेले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील गट आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात अध्यक्षपदावरून चढाओढ सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे राहणार अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी आग्रह करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवराज पाटील हे प्रमुख दावेदार असून, जयवंतराव शिंपी यांनी देखील थेट मुंबईमध्ये जाऊन लॉबिंग सुरु केली आहे.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
हे पण वाचा, धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी भेटीने जि.प. अध्यक्षपदाच्या हालचाली वाढल्या
युवराज पाटील हे गोकुळच्या संचालक पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा शब्द देण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी मैदानात ठाण मांडून आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत शब्द बदलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ग्रामविकास मंत्री या नात्याने माझ्या जेष्ठ सहकाऱ्याला नक्कीच हे पद मिळावे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. शेवटच्या टप्प्यात बदल करण्यासाठी त्यांची अजिबात सहमती नाही असे वातारण तयार झाले आहे.
हे पण वाचा, सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
आमदार पी. एन. पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मुलासाठी शब्द मागितला होता. राहुल पाटील यांनी गेल्या आठवड्यातच जिल्हा बँकेत हसन मुश्रीफ तर अजिंक्यतारावर सतेज पाटील यांची भेट घेतली होती. मात्र एक तासातच अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार अशी घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली होती. यानंतर युवराज पाटील यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीवर आले होते. सतेज पाटील यांनी देखील अध्यक्षपदावरचा दावा सोडलेला नाही. शासकीय विश्रामगृहावरील बैठकीनंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पी. एन. पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात झालेल्या भेटीनंतर सगळेच चौकस झालेले आहेत. आगामी काळातील जिल्हा बँकेच्या राजकारणासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शब्द बदलणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे पण वाचा,
‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
“चंद्रकांत दादा तुम्ही सगळी माया कुठं लपवून ठेवली आहे हे मला चांगलं माहित आहे”; हसन मुश्रीफ
“वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील”