कोल्हापुर: कोल्हापुरात आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मोठी टक्कर आहे. जिल्हापरिषद निवडणुकीसाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील गट आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात अध्यक्षपदावरून चढाओढ सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे राहणार अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीकडे जादुई आकड्यापेक्षा ७ सदस्य जास्त असल्याने महाविकास आघाडीचाच होणार आहे.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
हे पण वाचा, धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी भेटीने जि.प. अध्यक्षपदाच्या हालचाली वाढल्या
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक असणारे युवराज पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. शुक्रवारपासूनच महाविकास आघाडीचे सदस्य हे पन्हाळ्यात सहलीवर गेलेले आहेत. रविवारी संध्याकाळी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपापल्या पक्षांच्या सदस्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. दरम्यान या सर्वांमध्ये चर्चेचा सूर पाहता अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा, सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांच्या मुलाखतीवेळी अनेक नेत्यांची कोंडी झालेली होती. अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे राहावे यासाठी मंत्री सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत सदस्यांनी सूर लावला आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमधे अध्यक्षपद सोडू नये अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी युवराज पाटील यांना शब्द दिला होता त्या शब्दाचीही आठवण करून देण्यात आलेली आहे मात्र पुत्रप्रेमासाठी पी. एन. पाटील आघाडीवर असल्याने काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा,
‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
“चंद्रकांत दादा तुम्ही सगळी माया कुठं लपवून ठेवली आहे हे मला चांगलं माहित आहे”; हसन मुश्रीफ
“वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील”