मुंबई – एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष संपता संपत नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवाब मलिक आणि वानखेडे हे एकमेकांवर सातत्याने आरोप करत आहेत. नवाब मलिक रोजच्या रोज वानखेडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून त्यांना अडचणीत आणत आहेत.
ST संपाच्या तोडग्यासाठी आता पवारांचा पुढाकार; परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक
समीर वानखेडे याचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे देखील नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात गेले होते. नवाब मलिक हे ट्विटरच्या माध्यमातून दिवसेंदिवस काही ना काही पोस्ट करून आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र नवाब मलिक यांच्यकडे काही सबळ पुरावे असल्यामुळे कोर्टानेही मलिकांना ट्विट रोखण्यापासून थांबवले नाही.
त्यानंतर आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडेकरांच्या विरोधात पुरावे गोळा करून ते ट्विटरवर टाकले आहेत. क्रांती रेडेकर यांच्या व्हाट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट नवाब मलिक यांनी ट्विटरवर व्हायरल केले आहेत. यामध्ये काही खळबळजनक गोष्टी आढळून आल्या आहेत.
प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे
क्रांती रेडेकरांच्या चॅटमध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो नामक एका व्यक्ती क्रांती रेडकरला नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्यातील संबंधांचे पुरावे देण्याबद्दल बोलत आहे. त्यावर, हे पुरावे पाठवल्यास तुला बक्षीस दिलं जाईल, असं क्रांती रेडकर सांगत असल्याचं दिसतंय. नवाब मलिक यांनी हे चॅट ट्वीट केले आहे आणि ‘ओह माय गॉड’ असं देखील म्हटलं आहे.
क्रांती रेडेकरांचे चॅट खालीलप्रमाणे आहे;
कॅप्टन जॅक स्पॅरो: मॅडम, माझ्याकडं नवाब मलिक यांचं दाऊदशी कनेक्शन असल्याचे ठोस पुरावे आहेत.
क्रांती रेडकर: तुमच्याकडं काय पुरावे आहेत?
कॅप्टन स्पॅरो: नवाब मलिक आणि दाऊदचे फोटो माझ्याकडं आहेत.
क्रांती रेडकर: प्लीज, ते फोटो मला पाठवा. त्याबदल्यात तुम्हाला बक्षीस मिळेल.
Read Also :
- सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी मात्र सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेतं – पंकजा मुंडे
- नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी ठाकरे सरकारची अवस्था झाली – प्रीतम मुंडे
- शशिकांत शिंदेचा गेम करणाऱ्यांचा निषेध; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील कार्यालय फोडले
- संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; ST संपाबाबत चर्चा?
- आटपाडी राडा प्रकरण भोवणार?; अटकेपासून वाचण्यासाठी पडळकरांची उच्च न्यायालयात धाव