कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.आज यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज छाननी करण्याचं दिवस होता. कारखान्यात विरोधी पॅनल ला अर्ज छाननी मध्ये मोठा धक्का बसला आहे. krushna sahakari sakhar karkhana Election
अर्ज छाननीत अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनल आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत क्रांती पॅनलला जोरदार झटका बसला आहे. दोन मात्तबर उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने विरोधी पॅनलमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. संस्थापक पॅनलमधील डॉ. अजित देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी संचालिका उमा देसाई यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत क्रांती पॅनलमधील महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे.
दोन अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले आहे. कृष्णा काठी कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहितेंचे मनोमिलन होणार की नाही याकडे अजूनही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण व मंत्री विश्व्जीत कदम दोन्ही मोहितेंना एकत्रित आणण्यासाठी अजूनही जोर लावत आहेत. सहकार पॅनल ला या दोन बाद झालेल्या अर्जामुळे फायदा नक्की होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जर मनोमिलन झाले आणि दोन्ही मोहिते एकत्र आले तर मात्र परिस्थिती काही तरी वेगळी असू शकते.