कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. काल यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज छाननी करण्याचं दिवस होता. कारखान्यात विरोधी पॅनल ला अर्ज छाननी मध्ये मोठा धक्का बसला आहे.
सातारा कऱ्हाड मधील कोणतीही निवडणूक असली तरी सत्ताकेंद्र ठरवण्याची सर्व राजकीय खलबते मलकापुरात होत असतात. सर्व राजकीय गणिते जुळवण्याचा बाबतीत मलकापूरचा विशेष राजयोग आहे मात्र अजूनही मलकापूरला एकदाही कारखान्याचे संचालक पद मिळालेले आहे ही गोष्ट वाखाण्याजोगी आहे. कऱ्हाड च्या विकासात दिवंगत स्वातंत्र्यसैनिक ज्ञानदेव कराळे यांच्यासह मालकापुरातील तत्कालीन दिग्ग्ज यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले, आनंदराव चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी संस्थात्मक विकासात खारीचा वाटा उचलला होता.
डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांना एकत्रित आण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष ताकद लावलेली आहे. राज्यमंत्री विश्व्जीत कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दोन्ही मोहितेंनी एकत्र यावे असे सांगितले आहे. उमेदवारी अर्ज भरून झाले आहेत आणि आता प्रचारालाही सुरुवात होईल मात्र अजूनही दोन्ही मोहितेंच्या बैठकाच सुरु आहेत. आता पर्यंत साताऱ्यात ८ आणि जिल्ह्याबाहेर ६ ते ७ बैठका झालेल्या आहेत. असेच चालू राहिले तर दोन्ही मोहितेंच्या हातातून “हिच ती योग्य वेळ” निघून जाणार आणि त्याचा फायदा निश्चितच भोसले गटाला होणार हे सत्य आहे. आता कीती दिवस मनोमिलन लांबणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कृष्णाकाठी यशवंतराव कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आतापर्यंत सुरुवातीपासून अनेक सत्तासंघर्ष निवडणुकांमध्ये बघायला मिळालेले आहेत. या वर्षीची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार याबाबत हे येणाऱ्या आठवड्यातच कळेल. कारखान्यात मलकापुरातील २२९ सभासद आहेत आणि ही संख्या इतर गावांपेक्षा नक्कीच कमी आहे. कमी सभासद असल्याने नेहमीच मलकापूरला संचालक पदापासून डावलण्यात आलेले आहे. सत्ताधारी भोसले गटाचे सत्ताकेंद्र मलकापूर असल्याने मलकापुरात उमेदवारी मागण्यासाठी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळेस तरी मलकापूरला संचालक पद मिळणार कि नाही हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार आहे.